Main Page: Difference between revisions
No edit summary |
No edit summary |
||
| Line 94: | Line 94: | ||
* [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8 लेखन कसे करावे] | * [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8 लेखन कसे करावे] | ||
* [https:// | * [https://share.google/LfbqyOPhZgRj6oRSj/ शुद्धलेखनाचे नियम] | ||
* [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0 मराठी विकिपीडियावर महाराष्ट्र] | * [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0 मराठी विकिपीडियावर महाराष्ट्र] | ||
Revision as of 14:18, 11 January 2026
Citypedia is a encyclopedia which documents the cities, towns, and urban heritage of Maharashtra, where the people like you & me will contribute to write articles on personalities, institutions, events & happenings and also, civic issues
🏙️ Explore Maharashtra’s Cities, Citypedia Online: The Collaborative Encyclopedia of Cities in Maharashtra 🌆
* Personalities & Institutions | * History, Geography & heritage | * Infrastructure & Civic Issues
* Also the important News & Events, Documented by you & me, online
सिटिपीडिया: महाराष्ट्रातील शहरांसाठी एक अभिनव संकल्पना.. निर्मिती संकल्पना: सिटिपीडिया फाउंडेशन
महाराष्ट्रातील निवडक, प्रमुख शहरांसाठी प्रत्येक शहरांचा स्वतंत्र पण तरीही एकमेकांशी जोडून घेणारा विकसित होणारा ज्ञानकोश (इन-सायक्लोपीडिया) म्हणजे सिटिपीडिया ऑन-लाईन. २ ऑक्टोबर २०२५ रोजी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आरंभ झाला असून दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी, जागतिक सिटिपीडिया दिनाच्या मुहूर्तावर मुख्य सिटिपीडिया (सिटिपीडिया ऑनलाईन) आणि त्याबरोबरच (मुंबई सिटिपीडिया), (पुणे सिटिपीडिया) आणि (ठाणे सिटिपीडियाची) सुरुवात झाली.
सिटीपीडिया वर आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. सिटीपीडिया हे शहरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडेल असा ज्ञानकोश बनावा असा आमचा प्रयत्न आहे. आपण कशा प्रकारे यात सामील होऊ शकता ? प्रथम सिटीपीडिया या संकेत-स्थळावर सदस्य व्हा त्यानंतर सहभागी व्हा आणि आपल्या आवडीच्या विषयावर लिखाण करा (प्रकाशित झालेल्या लेखांमध्ये बदल करा किंवा नवीन लेख लिहा).
Citypedia is ready for following cities
सिटिपीडिया: शहरातील नागरिकांचा साथी
सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. !
शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.
शहरात राहणार्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
"A city is not just a place in space, but a drama in time."
लिखाण वर्गवारी: कोणत्याही शहराच्या सिटिपीडियावर जे लिखाण उपलब्ध त्यांची विभागणी खालील विषयांवर (Categories) केलेली आहे, आणि प्रत्येक सिटिपीडियाच्या मुख्य पानावर ही वर्गवारी वरच्या भागात मेन्यूच्या स्वरूपात मिळेल, त्या त्या विषयावर क्लिक केल्यास त्या त्या विषयाच्या लेखाची यादी समोर येईल
शहरातील रथी महारथी | शहरातील संस्था उपक्रम | नगर नियोजन | लोकप्रतिनिधी | नागरी समस्या | ज्येष्ठ नागरिक | ई-बुक ऑडिओ लेख | कला क्रीडा सांस्कृतिक | पर्यावरण | शासकीय योजना | चित्रपट नाट्य परीक्षण | कामगार | कोर्ट कायदा नियम | सिटीपीडिया
| ध्येय आणि उद्देश | शहराला आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर नागरिकांना लिहिते करणारे आणि अंतिमत: माहितीपूर्ण माध्यम म्हणून सिटीपीडिया हे पोर्टल विकसित करणे, त्यातून नागरी समस्यांवर चर्चा घडवून आणणे आणि सामूहिक मंथनातून उपाय शोधणे. विकिपीडियाच्या धर्तीवर कोणीही कोणत्याही विषयावर (व्यक्ति, संस्था, घडामोडी आणि नागरी समस्या) लिहावे, हा प्रयत्न आम्ही करीत आहोत. |
|---|---|
| काय शक्य आहे | या सिटीपीडिया पोर्टलवर तज्ञ आणि जाणकार देखील मार्गदर्शन करतील, त्यातून बिकट होत जाणाऱ्या नागरी समस्यांवर चर्चा घडून येईल, स्थानिक प्रशासनाला देखील त्यातून दिशा मिळेल. सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना आणि शहरातील अन्य नागरिकांना देखील प्रेरणा मिळेल आणि आदर्श नगर-नियोजनाचा आराखडा देखील या प्रयत्नाद्वारे विकसित होऊ शकेल. |
| प्रामाणिक आवाहन | व्हॉट्स ऍप, फेसबुक वगैरे सोशल माध्यमे असतांना सिटीपीडियाची गरजच काय? फेसबुकमघ्ये मित्रांचा समुदाय म्हणून व्यक्त होता येते. पण ते वाटते तेवढे 'खुलें नसते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य 'प्रतिध्वनी' सारखे उमटते. म्हंणजे त्यात एक प्रकारे आपणच आपल्याशी बोलत असतो. व्हॉट्स ऍपला खूप मर्यादा आहेत, ते गटांतर्गत परस्पर संवाद साधण्यापुरते मर्यादित साधन आहे. फेसबुक आणि व्हाट्स ऍपवर जुन्या पोस्ट पटकन शिळ्या होतात. दोन्हीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मर्यादा आहेत. जुना मजकूर शोधता येत नाही, याउलट विकिपीडिया, सिटीपीडिया अशी डिजिटल माध्यमे आहेत की ज्यात समुदायाला एकत्रित अभिव्यक्ती मिळते. काहीच शिळे होत नाही आणि प्रत्येक लेख सतत चालूच राहतो. सिटीपीडिया हे नागरिकांसाठी एक असे खुले व्यासपीठ आहे की जेथे आपले प्रश्न, सुखदुःखे, अडीअडचणी मांडता येतील. यातील सर्व लिखाण सामुदायिकपणे व्हावे असे अपेक्षित आहे. 'लिहा, वाट पाहू नका!' 'लिहा, व्यक्त व्हा!' ही त्यावर घोषवाक्ये आहेत आणि सर्वांना ते आवाहन आहे. |
