MediaWiki:Requestaccount-text
सिटीपीडिया म्हणजे काय ?
सिटीपीडिया म्हणजे ठाणे शहरातील घडामोडींवर आणि नागरी समस्यांवर सामान्य नागरिक, कार्यकर्ते, तज्ञ यांनी लिहीत बनविलेला आंतरजालावरील (इंटरनेट) ज्ञान-कोश, म्हणजेच एक प्रसिद्ध विकिपीडियाच्या धर्तीवर बनविलेले संकेतस्थळ. विकिपीडियावर आपल्यापैकी कोणीही कोणत्याही विषयावर लिहू शकतो, तसे सिटीपीडियावर आपल्यापैकी कोणीही नागरी-समस्येशी संबंधित कोणत्याही विषयावर लिहू शकतो. काही काळानंतर त्यातून एका संदर्भ-ग्रंथाचा किंवा ज्ञान-कोशाचा जन्म झालेला असेल. विकिपीडिया असाच एक संदर्भ ग्रंथ आणि ज्ञान-कोश बनला.
सिटीपीडियावर एका विषयावरील एका लेखात आता अनेक कार्यकर्ते लिहीतील वेगवेगळ्या वेळी, वेदनेतून, त्रासातून सामान्य माणूस लिहिता होईल, तोच एक लेख प्रत्येकाच्या अनुभवातून ते अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल, त्याच विषयावर एकाच ठिकाणी विषय-तज्ञाचे मत मिळेल, सामान्य माणसाचा अनुभव वाचता येईल, त्याच विषयावर एकाच वेळी मोठ्या शहरातील व लहान शहरातील दृष्टीकोण वाचायला मिळेल. प्रत्येक विषयावरील होणारे लिखाण वर्गवारी-नुसार एकत्र मिळेल. उदा."शहरातील निवारा प्रश्न" या विषयावर वस्त्यांचे वास्तव, झोपडपट्टी-सुधारणा, SRA, MHADA, स्वस्त घरे, धोकादायक इमारती, मालक-भाडेकरू, जुन्या इमारतींचा विकास अशा सगळ्या उप-विषयांवर सर्वसामान्य ते तज्ञ असे सर्वांचे मत, अनुभव एकत्र मिळेल.
ज्याप्रमाणे विकिपीडिया हा ज्ञानकोश जगातील जनतेने सामुदायिकपणे विकसित केला त्याचप्रमाणे शहरीकरणाचा वेध घेण्यासाठी सीटीपीडिया हा सामुदायिकपणे तयार होणार असून त्याचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना शहरीकरणातून उद्भवणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी व्हावा अशी कल्पना आहे.Request for User Account
Complete and submit the following form to request a Citypedia Online user account.
IMPORTANT – Account approval requirements
To request an account, you MUST include the following in the biography box below:
1) Your contact number (minimum 10 digits) 2) Your full address (area, city, pincode)
Requests missing phone number or address will be rejected without review.